• USER LOGIN
 • Close
 • Email
  Password
Forgot your password?
   
 
 • Don't have an account?
 • Create One!
Forgot your Password?
Enter your Email Address here to receive your password.
 • Email
   

Sign in with
 • Login
 • Close
Email *    
Password *  
Re Enter Password *  
 
Articles

दिल्लीतील पाहिलं व्हॉट्स ऍप द्वैभाषिक अ-नियतकालिक मॅगझिन

By Vijay Satokar
Aug 31, 2020

Our girl in Bairut

दिल्ली दूर अस्त....? चर्चा भाग २

नागपूर  पंतप्रधान पद मिळवून देऊ शकतं आता, दिल्लीत ' वजन ' वाढलंय महाराष्ट्राचं, म्हणतायत ज्येष्ठ पत्रकार प्रमोद मुजुमदार

*

भाषा?

राजकारण?

हिंदी?

मागील एका लेखात लिहिलेल्या खालील ओळींवर:

"....दुखावलेली दिल्ली सहज पणे सामावून घेत नाही बाहेरून येणाऱ्याना. शहराला समजावून घ्यावं लागतं.. दिल्लीच्या प्रेमात पडाल तर शहर मैत्री करतं तुमच्याशी. 'दिल ' जिंकण गरजेचं, दिल्लीचं तख्त काबीज करायचं असेल तर. राजधानीत दीड दशक काम करताना एक बाब प्रकर्षाने जाणवत राहिली.. मराठ्यांच, मराठी माणसाचं,  महाराष्ट्राचं दिल्लीवर प्रेम अस कधी जडलच नाही, दिल्लीच्या तख्तावर कधी नजर गेलीच नाही. (अजूनही नाही! ) महादजी शिंदे चावडी वर बसून (आजचा ' चावरी ' बझार) बादशहाला सल्ले देत, मुघल साम्राज्य चालवत.....",

बऱ्याच वाचकांच्या प्रतिक्रिया आल्या. त्यापैकी बोलक्या दोन-

श्री सुधाकर भाले, भोपाळ:

यात मला असे वाटते की भाषेची मोठी अडचण आहे.जोंवर आम्ही हिंदी आत्मसात करणार नाही, तेथील खाण्यापिण्याची आवड निर्माण. करणार नाही, तेथील पंजाबी लहजाची भाषेत थोडेफार रंगणार नाही तोवर ते कठिण च् वाटते.आणि मुख्य म्हणजे दर शुक्रवारी रिटर्न् तिकीट काढण्याची सवय बदलायला हवी.,😊😊

श्री शिरीष कुलकर्णी, नवी दिल्ली:

दिल्लीत ६ दशकाच्या वर राहुन हि अजुन ईथे आपण उपरे च समजले जातो. हि खंत मराठी मनात कायम आहे...

**

भाषा, विदर्भ, हिंदी, पश्चिम महाराष्ट्र आणि दिल्ली...

४० वर्षाहून अधिक काळ दिल्लीत घालवलेले प्रमोद मुजुमदार. त्यांनी राजधानीतील राजकारण जवळून पाहिल आहे.

काँग्रेस श्रेष्ठींनी महाराष्ट्रातील नेत्यांना वर येऊ दिलं नाही.. सध्या परिस्थिती वेगळी आहे... दिल्लीतील मराठी नेतृत्वात ताकत आहे पुढे जाण्याची.

पुण्या मुंबईच्या नेत्यांना दिल्लीत करमत नाही, हिंदिही नीट बोलता येत नाही. हिंदीचा आणि वैदर्भीय जनतेचा जुना संबंध, त्यांना दिल्लीत करमत, भाषा आड येत नाही.

ऐका आमची दिल्लीची बातचीत प्रमोद मुजुमदार यांच्या सोबत...

 • Print
 • share Share
comments powered by Disqus